breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

वेलिंगटन: संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या महासाथीशी लढा देत आहे. या व्हायरसशी लढताना लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. अशातच न्यूजीलँड एक आदर्श होऊन समोर आलेला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये कडक नियम आखत कोरोनाला नियंत्रणात आणलेलं आहे. त्यामुळे या लेडी पंतप्रधानांचं जगभरात खूप कौतुक केलेलं जात आहे.

येथे गेल्या 100 दिवसात एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. न्यूजीलँडमध्ये मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन अत्यंत कडक केलेला होता. यातून संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. त्यावेळी देशात केवळ 100 जणांना संसर्ग झालेला होता. देशात रविवारी संक्रमणाची एकही नोंद आलेली नाही. गेल्या 100 दिवसात एकही रुग्ण संक्रमित झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात या देशात कमी जणांना लागण झाली असून यातही आंतरराष्ट्रीय प्रवास  करणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना परदेशातून परतताना सीमेवरच क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button