breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजन

पिंपरीच्या डी.वाय.पाटील विद्यापीठात ‘जबरिया जोडी’ चित्रपटाचे प्रमोशन

– अभिनेत्री परिणिती चोप्रा व अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रांचे चित्रपटातील गाण्यावर चाहत्यांसोबत केला डान्स
पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  अभिनेत्री परिणीती चोप्रा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा एकत्रित असलेला आगामी चित्रपट ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने पिंपरीच्या डॉ .डी. वाय पाटील विद्यापीठात आले होते. यावेळी जबरिया जोडी अर्थात परिणीती व सिद्धार्थ डॉ. डी. वाय पाटील दंत महाविद्यालयात येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. टाळया, शिट्ट्यांच्या आवाजात त्यांचे तरुणाईने स्वागत केले.
ॲक्शन कॉमेडी बेस्ड हा चित्रपट आहे. हा सिनेमा बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच ‘पकडूआ शादी’ ह्या प्रथेवर आधारित आहे. हुंडा मागणार्‍या वराला किडनॅप करून त्याचे लग्न लावून दिले जाते. ‘जबरिया जोडी’चा ट्रेलर मजेशीर आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा तसेच जावेद जाफरी, अपारशक्ती खुराना, संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ते दोघे बालाजी टेलिफिल्म्स व कर्मा मीडिया अँड एण्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘जबरिया जोडी’ चित्रपटात एकत्र आले आहेत. जवळपास पाच वर्षानंतर सिद्धार्थ व परिणीती एकत्र काम केले आहे. यापूर्वी दोघे २०१४ साली प्रदर्शित झालेला हसी तो फसी चित्रपटात झळकले होते.
या चित्रपटाबद्दल थोडक्यात सिद्धार्थ याने भाष्य  केले. ‘जबरिया जोडी’ च्या गाण्यावर दोघांनी नृत्य केले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थिती होती. या चित्रपटाच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सुद्धा नृत्य सादर केले. सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘जबरिया जोडी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  हा  चित्रपट सर्वानी पाहावा यासाठी अभिनेत्री परिणीती चोपडा यांनी सर्वाना आवाहन केले.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कोषाध्यक्ष व ट्रस्टी डॉ यशराज पाटील व पत्नी यशश्री पाटील यांनी अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे स्वागत केले व त्यांच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.
https://youtu.be/EMETUG2YRRk
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button