breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तबलिगी जमातच्या तपासात ED च्या हाती मोठी माहिती; मुंबईतील नेत्याचं हवाला कनेक्शन असल्याचा ED चा संशय

नवी दिल्ली: केंद्रीय तपास एजंसी ED च्या टीमने 19 ऑगस्त रोजी देशातील 20 लोकेशन वर छापेमारी केली होती, या दरम्यान ED ला अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळालेली आहे. ED च्या टीमला राजधानी आणि मुंबईसंबंधित काही हवाला व्यवसाय आणि तबलिगी जमातशी संबंधित कनेक्शनबाबत माहिती मिळालेली आहे.

या प्रकरणाचा जेव्हा अधिक तपास करण्यात आलेला तेव्हा मुंबईतील एका स्थानिक मोठ्या नेत्याचं आणि व्यावसायिकांचं हवाला कनेक्शन असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता या प्रकरणाचं गांभीर्य पाहता त्या सर्व कनेक्शनबाबत ईडीची टीम शोध घेत आहे. ED ची टीम लवकरच मुंबईशी संबंधित तब्लिगी जमात – हवाला कनेक्शन असलेले व्यावसायिक आणि त्या स्थानीक नेत्यांमध्ये असलेल्या कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा करू शकतेय.

तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केलेली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरी, SV रोड यासह एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत. तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याविरोधात 17 एप्रिल रोजी पैशाच्या अफरातफर प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाईला वेग आलेला असून मुंबतही छापेमारी करण्यात येत आहे.

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झालेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button