पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरीतील रेल्वेमार्गावरील इंदिरा गांधी उड्डाणपुलाची पडझड, दुरवस्था झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये समोर आले आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
विलास मडिगेरी स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुल खुप जूना झालेला आहे. या पुलाला 35 वर्षे पूर्ण झाली असून हा पूल शहरातील आहेत. या पुलाला चारही बाजूने पोहोच रस्ते आहेत. सध्यस्थितीत पुलाची पडझड व दुरवस्था झाल्याने कधीही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे गांधी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार कन्स्लटंट मे. सी. व्ही.कांड कन्स्लटंट प्रा.लि यांनी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले. त्यासाठी 4 लाख 21 हजार रुपये खर्च करण्यात आला. त्यांच्या अहवालानुसार पुलाच्या दुरुस्तीची कामे आवश्यक आहेत. ही कामे करण्यासाठी रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार झाला आहे. त्यानुसार निविदा काढली जाणार आहे. तसेच, या दुरुस्तीच्या कामासाठी सल्लागार म्हणूनही महापालिकेने मे. सी. व्ही.कांड कन्स्लटंट प्रा.लि यांचीच नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.