breaking-newsआंतरराष्टीय

पाहा: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे ‘बाप नृत्य’

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या सध्या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे आपली आर्थिकस्थिती सुधारावी, व्यापारीसंबंध वाढावे म्हणून थेरेसा मे आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. प्रथम त्यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. त्यानंतर त्या केनिया आणि नायजेरिया या देशांना भेट देणार आहेत.

दक्षिण आफिका येथील केप टाऊन शहरातील एका शाळेला थेरेसा मे यांनी भेट दिली. त्यादरम्यान तेथील लहान विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी स्वागत गीत गायले. त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांना नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी देखील त्यांच्या भात्यातील एक-दोन स्टेप करत आनंद घेतला. दक्षिण आफ्रिका सरकारने हा व्हिडिओ ट्विट केला. त्यानंतर ट्विटरवर मोमेंट सुरु झाली.

DIRCO South Africa

@DIRCO_ZA

[WATCH]: Prime Minister at ID Mkhize Senior Secondary in Gugulethu, Cape Town. @SABCNewsOnline @SAgovnews @KhayaJames @UbuntuRadioZA @PresidencyZA @DBE_SA

ब्रिटनमधील त्यांच्या अनेक विरोधकांनी यावर टीकाकरत त्यांना ‘रोबोमे’ असे संबोधले आहे.  ट्विटरवर त्यांच्या नृत्यकौशल्याला काही ठिकाणी ‘डॅड डान्सींग’ तर काहीठिकाणी ‘पेनफुल’ अर्थात दुःखद म्हटले आहे.

ब्रिटन युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यानंतर २०१६मध्ये थेरेसा मे पंतप्रधान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची ही आफ्रिका देशात पहिलीच भेट आहे. या भेटीचा मुख्य उद्देश हा व्यापारी संबंध वाढविणे हा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button