breaking-newsपिंपरी / चिंचवड

चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून चिमुकलीवर बलात्कार

पिंपरी :- चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून एका इसमाने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे शुक्रवार (दि. 31 ऑगस्ट) रोजी रात्री आठच्या सुमारास घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहनगाव येथे बिगारी काम करतात. 31 ऑगस्ट रोजी आरोपीने वाहनगाव येथील इंद्रधनुष्य फार्म येथे चिमुरडीला चॉकलेट देण्याचे अमिश दाखविले. चॉकलेट मिळणार या आशेने चिमुरडी आरोपीसोबत घरामध्ये गेली. घरात आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या पालकांना घडलेल्या प्रसंगाबाबत सांगितले. त्यावरून पालकांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी मूळ राजस्थान येथील असून तो कामासाठी मावळ परिसरात आला होता. घटनेनंतर तो पळून गेला आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button