breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पावसाळ्यात वीज खंडीत होऊ देऊ नका; आमदार लांडगे यांच्या अधिका-यांना सूचना

  • भोसरी विधानसभा विद्युत समितीच्या बैठकीत दिल्या सूचना
  • महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांचाही घेतला आढावा

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. काही ठिकाणचे ट्रान्सफर ‘ओव्हर’ लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. नवीन ग्राहकांना त्वरित वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. थोकादायक वायर ‘अंडरग्राऊंड’ करण्यात याव्यात, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहेत.

भोसरी विधानसभा विद्युत समितीची आढवा बैठक शुक्रवारी (दि.25) भोसरीत पार पडली. आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बो-हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोणती कामे झाली आहेत. 2018-19 मध्ये कोणती कामे केली जाणार आहेत, त्याचा आराखडा तयार करणे. चोविसावाडी, काटे कॉलनी या परिसरातील विद्युतविषयक तक्रारी येत आहेत. त्यांचे वेळेत निराकरण करण्यात यावे. जाधववाडी येथे नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यात यावे. भोसरी, लांडे चौकातील ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत. नवीन ग्राहकांना वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. मोशी शाखा कार्यालयाला मीटर द्यावेत. प्राधिकरण, शिवाजीनगर येथील पोल काढणे. पीएमटी चौकातील ट्रान्सफॉर्मर चालू करणे. सॅन्डवीक कॉलनी, भोसरी गावठाण मधील ओव्हरहेड ते अंडरग्राऊंड करणे. रामनगर मधील ट्रान्सफॉर्मर बदलण्यात यावा. रस्त्यावरील मीटर पोल शिफ्ट करावेत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या.

दिघी, ज्ञानेश्वर पार्क येथील ओव्हरहेड वायर बदलणे. सांवतनगर कमान ते ममता स्वीट होम चौकातील पोल शिफ्टींग करण्यात यावेत. आदर्शनगर, ज्ञानेश्वर पार्क, गजानन महाराज नगर, गणेशनगर परिसरातील वायर अंडरग्राऊंड करणे. च-होली ताजणेमळा येथील सर्व्हिस वायर व्यवस्थित करण्यात याव्यात, किंवा अंडरग्राऊंड करावे. निगडी, सेक्टर 22 येथे नवीन पोल टाकण्यात याव्यात, अशा सूचना आमदार लांडगे यांनी अधिका-यांना केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button