breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी भारत मिरपगारे यांची निवड

पिंपरी – रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे यांची निवड करण्यात आली. तर, पिंपरी-चिंचवड शहराच्या उपाध्यक्षपदी भारत मिरपगारे, अमोल उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

रिपब्लिकन युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडली. या बैठकीला रिपब्लिकन मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत मिरपगारे, अमोल उबाळे यांची पिंपरी-चिंचवड शहराच्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button