breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अमेरिका, ब्रिटनसह ४ देशांचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार

नवी दिल्ली – चीनमधील उइगर मुस्लिमांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल चिंता व्यक्त करत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडाने बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. यावर संताप व्यक्त करत चीनने गुरुवारी या चारही देशांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, सोमवारी, बायडन प्रशासनाने पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बीजिंग ऑलिम्पिक खेळांवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मात्र अमेरिकेचा बहिष्कार आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखणार नाही, असे चीनने स्पष्ट केले आहे. तर २०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये आपले सरकारी अधिकारी किंवा आपले मुत्सद्दी पाठवणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्याचवेळी, अमेरिकेने हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला तर तेही याचा सूड उगवेल, अशी धमकी चीनने या घोषणेपूर्वीच दिली होती. बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर अमेरिकेसह चार देशांनी राजनैतिक बहिष्कार टाकल्याने चीन खवळला आहे.

चीनने इशारा दिला होता की, मानवाधिकाराच्या चिंतेवरून बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकवरील राजनैतिक बहिष्कारासाठी अमेरिकेला किंमत मोजावी लागेल. अमेरिकेसह चार देशांच्या या निर्णयाने खेळाडूंना पुढील वर्षी फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी होण्यापासून रोखले आहे. या चारही देशांना बहिष्काराची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही चीनने गुरुवारी दिला. खरे तर, चीनमध्ये उइगर मुस्लिमांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत अमेरिकेने ही भूमिका घेतली आहे. याआधीही अमेरिकेसह अनेक देशांनी उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावरून नाराजी व्यक्त केली आहे. चीनमध्ये बिजिंग हिवाळी ऑलिम्पिक ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, जर अमेरिकेने असे केले तर ते राजकीयदृष्ट्या चिथावणीखोर कारवाई असेल. चीन कसा प्रत्युत्तर देईल याचा खुलासा त्यांनी केला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button