breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेतील विषय समित्यांवर या नगरसेवकांची वर्णी

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यांची आज मंगळवारी (दि. 13) सर्वसाधारण सभेत निवड झाली. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची सदस्य म्हणून प्रत्येक समितीमध्ये निवड करण्यात आली.

ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या सभेत विषय समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. कोविड 19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने विषय समितींच्या निवडी करण्यास मनाई केली होती. 14 जून रोजी समितींची मुदत संपल्यामुळे समित्या बरखास्त करण्यात आल्या. दरम्यान, राज्य सरकारने व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्याची मुबा दिली. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची निवड करण्यात आली.

पक्षीय बलाबलानुसार निवड झालेले नगरसेवक

विधी समिती : – स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले (भाजप), अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमित गावडे (शिवसेना)

महिला व बालकल्याण समिती :- योगिता नागरगोजे, सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापूरे, निर्मला गायकवाड (भाजप), मंगला कदम, गीता मंचरकर, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना)

शहर सुधारणा समिती :- साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोरखे, सुनीता तापकीर, शारदा सोनवणे (भाजप), वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती :- अश्विनी जाधव, केशव घोळवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ (भाजप), डब्बू आसवानी, अपर्णा डोके, प्रवीण भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)

शिक्षण समिती :- सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनीषा पवार, माया बारणे, तुषार कामठे (भाजप), मोरेश्वर भोंडवे, स्वाती काटे, भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे

सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समिती नियुक्त करण्यात येणा-या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर ढोरे यांनी सदस्यांची नावे वाचून समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button