breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,47,509 वर

  • मुंबईत 758, पुण्यात 785 नवे रुग्ण

मुंबई – शनिवारी दिवसभरात आढळलेल्या 4,922 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,47,509 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 5,834 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 95 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,15,884 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 47,694 वर पोहोचला आहे. तर सध्या 82,849 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 758 नवे रुग्ण आढळले, तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,85,267 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,940 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2,59,435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 14,048 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 785 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,47,130 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,478 इतका झाला आहे. तसेच काल 701 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,27,824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 785 रुग्णांमध्ये 351 रुग्ण पुणे शहरातील असून 167 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड आणि 202 ग्रामीण भागातील व 65 कंटेनमेंट झोनमधील रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button