breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करसंकलन विभागात तीन लाखांचा अपहार; 54 मिळकतीच्या बिलांमध्ये फेरफार

तळवडे, किवळे झोनमधील प्रकार; निगडी झोनचे लाॅगिन आयडी वापरुन बिले रद्द

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या तळवडे, किवळे झोनमधील सुमारे 54 मिळकतींच्या बिलामधून फेरफार करुन तब्बल 3 लाखाचा अपहार झाला आहे. विशेषता माजी सैनिकांना मिळकत करांमध्ये पालिकेकडून सवलत दिली जाते. मात्र, सैनिक नसतानाही काहींना मिळकत करांमध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागात माजी सैनिकांना मिळकत करांमध्ये सवलत दिली जाते. मात्र, सैनिक नसतानाही त्यांच्या मिळकत करांच्या बिले दाखवून काही मिळकतींच्या पावत्या रद्द केलेल्या आहेत. महापालिकेच्या मिळकतकरांच्या बिलांमध्ये फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. महापालिकेच्या मिळकतींचे संकलन करण्यासाठी येस बॅंकेने सब ठेकेदार नेमून काही कंत्राटी कामगार नियुक्त केले होते. त्यामध्ये किवळे, तळवडे झोनमधील 54 केसेसमधून निगडी झोनचे लाॅगिन वापरुन मिळकतींच्या पावत्या रद्द केलेल्या आहेत.

तसेच महापालिकेच्या करसंकलन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून 16 करसंकलन झोनचे लाॅगिन आणि पासवर्ड बदलण्यात आले आहेत. याशिवाय ज्यांच्याकडे लाॅगिन दिलेले आहे, त्याना ओटीपी नंबर बंधनकारक केलेला आहे. प्रत्येक कर्मचा-यांचा मिळकत करांमधील थेट हस्तक्षेप बंद केला आहे. मिळकतींच्या पावत्यामधील इडिट सेवाही बंद केली आहे. तसेच काही बिलांची शोध मोहीम देखील केलेली असून इनवर्ड झालेले अर्ज गहाळ होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यासाठी देखील स्वतंत्र रजिस्टर करुन त्याची शोध मोहीम सुरु केले आहे.

माजी सैनिकांना मिळकतकरांमध्ये मिळते सवलत

शौर्यपदक विजेते, माजी सैनिकांच्या विधवा, शहीद सैनिक यांना मिळकतकरात १०० टक्के तर, महिलेच्या नावाने असलेल्या एका निवासी घराला ५० टक्‍क्‍यांपर्यंत मिळकतकरात सूट देण्यात आली आहे. माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी हे स्वतः राहत असलेल्या फक्त एक निवासी घर केवळ महिलेच्या नावे असलेल्या आणि स्वतः राहत असलेल्या केवळ एक निवासी घर, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अंध-अपंग, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावे असलेल्या मिळकतींच्या मिळकतकरात प्रत्येकी ५० टक्‍क्‍यांची सवलत दिली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button