पिंपरी / चिंचवड

तळवडे येथे उघड्या दरवाजावाटे 95 हजारांची चोरी

पिंपरी l प्रतिनिधी

खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन दोघेजण खोलीत झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी खोलीच्या उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करून लॅपटॉप, टॅब, पाकीट असा एकूण 95 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी तळवडे येथे घडली.

कार्तिक राममूर्ती (वय 25, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे दोन मित्र तळवडे येथे प्रवीण जामदार यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहतात. ते शनिवारी सकाळी खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे खोलीत प्रवेश केला. खोलीतून तीन लॅपटॉप, एक टॅब आणि एक पाकीट असा एकूण 95 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button