breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे उपक्रम, या कामांना प्राधान्य मिळणार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले. त्यामध्ये शहरातील काही महत्वाच्या भागातील लोकसंख्या आणि विकासाचे प्राधान्य ओळखून तरतूद करण्यात आली आहे.

2020-21 या आर्थिक वर्षांसाठीचा पिंपरी-चिंचवड पालिकेचा मूळ 5 हजार 232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांचा समावेश असलेला एकूण 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. 17) स्थायी समितीपुढे सादर केला. त्यातील महत्वाचे उपक्रम खालील प्रमाणे आहेत.

  • प्रभाग 2 बो-हाडेवाडी विनायकनगर, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणे.
  • वेंगसरकर अॅकॅडमी येथे पॅव्हेलीयनचे काम करणे, थेरगांव येथे खेळाचे मैदान विकसित करणे
  • पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक 362 येथे खेळाचे मैदान विकसित करणे तसेच पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक 367 अ येथे खेळाचे मैदान विकसित करणे. या कामांसाठी एकूण तरतूद रु. 11 कोटी 85 लाख.
  • प्रभाग 10 पिंपरी येथील सर्व्हे नं. 31/1-1 येथे नि:समर्थ दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे,  आकुर्डी येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधणे
  • थेरगांव सर्व्हे नं.9 येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नवीन इमारत बांधणे या कामांसाठी – एकूण तरतूद रु. 17 कोटी 95 लाख
  • वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे – रु. 4 कोटी
  • ताथवडे येथील शनी मंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे – रु. 5 कोटी
  • ताथवडे गावठाणापासून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे – रु. 4 कोटी 50 लाख
  • ताथवडे येथील जीवननगरकडून मुंबई बेंगलोर हायवेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे – रु. 4 कोटी 50 लाख
  • खंडोबा माळ चौक म्हाळसाकांत चौकापर्यंत पालखी मार्गाचे काँक्रीटीकरण करणे – रु. 6 कोटी 23 लाख
  • वाकड गावठाण येथील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करणे – रु. 4 कोटी 50  लाख
  • वाकड काळा खडक ते वाकड पोलीस स्टेशन येथील डीपी रस्ता विकसित करणे – रु. 3 कोटी
  • प्रभाग क्र. 25 मध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे – रु. 5 कोटी
  • प्रभाग क्र.26 मध्ये छत्रपती चौक ते उत्कर्ष चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे – रु. 5 कोटी
  • वाकड येथील कावेरी चौक सब-वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डीपी रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणे – रु. 9 कोटी 46 लाख
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button