breaking-newsताज्या घडामोडीपुणे

इंदुरीकर महाराजांनी ते विधान करायला नको होतं -भाजपा

पुणे | महाईन्यूज

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मतं मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केला होता. ओझर येथे झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं इंदुरीकर महाराजांनी म्हणाले होते.

इंदुरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला होता. या आरोपानंतर महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, “इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होतं. इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, एका वाक्यानं व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,” असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button