breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालकांची मानमानी अन् शिक्षकांची मनधरणी, यात शाळा मालकांवर आर्थिक ‘आणीबाणी’

  • शालेय शूल्कासाठी तगादा लावत असल्याच्या निव्वळ अफवा
  • शिक्षण अधिका-यांनी शाळा मालकांची व्यथा जाणून घ्यावी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील खासगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या पालकांना वार्षिक शूल्कासाठी तगादा लावत असल्याची आफवा पसरवली जात आहे. या आफवेला बळी पडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण अधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी चौकशीसाठी काही शाळांच्या बँक खात्याची माहिती मागविली. मात्र, त्यांनी संस्थाचालकांचे दुःख समजून घेण्याची तयारी दाखविली नाही. त्यातच पालकांची मनमानी खपवून शिक्षकांची मनधरणी करता-करता आर्थिक संकटात सापडलेल्या संस्थाचालकांनी पालिकेतील शिक्षण प्रशासनावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोविड 19 विषाणू संक्रमणाचा धोका वाढल्यामुळे राज्य सरकारने 22 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले. शाळांना सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शाळा मालकांनी शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन शिकवणे शक्य झाले. अभ्यासक्रम पूर्ण होत असला तरी शाळेचे शूल्क भरण्यास असंख्य विद्यार्थ्यांचे पालक चालढकल करत आहेत. आज-उद्या करत सहामाहीचे सत्र संपून गेले तरी पालक वर्गातून शालेय शूल्क भरण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

आज सुध्दा पालकांना शूल्क भरण्याची विनंती केली तरी शाळेकडून धमकी दिली जाते, तगादा लावला जातो, दबाव आणला जातो, विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाते, ऑनलाईन ग्रुपमधून बाहेर केले जाते, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्याची शहानिशा करण्यापूर्वीच महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी शिंदे यांनी खासगी इंग्राजी माध्यमाच्या 25 शाळांना नोटिसा बजावल्या. चौकशी करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागवून घेतली. यातून काजीच निष्पन्न झाले नाही. मात्र, वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे कार्य करून सुशिक्षित पिढ्या घडविणा-या शाळांची बदनामी करण्यात आली.  

शाळा मालकांची चौकशी लावणे खेदजनक

मुळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी टप्प्याटप्प्याने शूल्क भरावेत, यासाठी प्रतिमहा, प्रति दोन महिने, तीन महिन्याचा अवधी दिला. तरी अनेकांनी शूल्क भरण्याची तयारी दाखविली नाही. शुल्कापोटी जमा होणारी रक्कम येत नसल्यामुळे शिक्षकांचे मासिक वेतन वेळेवर जात नाही. त्यामुळे शिक्षक काम करण्याची तयारी ठेवत नसल्याची वास्तुस्थिती आहे. आर्थिक संकटामुळे कोरोनाकाळात 50 टक्के वेतनावर काम करण्याची शाळा मालकांनी विनंती केली. मात्र, ती विनंती धुडकावून शिक्षक काम सोडण्याची धमकी देत आहेत. सर्वच शिक्षकांनी काम सोडले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, अशा दुहेरी चक्रात सापडलेल्या शिक्षण संस्थाचालकांना आर्थिक भार सोसण्याची तयारी ठेवावी लागत आहे. अनेक शाळा मालकांनी शिक्षकांचा पगार आणि शाळेचा खर्च भागवण्यासाठी बँकेतून 1 कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज घेतल्याची माहिती संस्थाचालक सांगत आहेत. शाळा मालकांचे दुःख जाणून घेण्याऐवजी त्यांना चौकशीच्या फे-यात अडकवणे अत्यंत खेदजनक असल्याची व्यथा शाळा मालकांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button