breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पालकमंत्री पुण्याचे, कार्यअहवाल नागपूरला प्रकाशित ; वाह रे पालकमंत्री!

पुणे – पुण्याचे पालकमंत्री या नात्याने पाच वर्षातील कार्याचा अहवाल नागपुरात प्रकाशित केल्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांना नेटकर्‍यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

वाह गिरीश बापट. याच का तुमच्या निष्ठा. निवडणुका आल्या की मतांची झोळी पसरवायची आणि हाय कमांडला खूष करण्यासाठी नागपूर वारी करायची, अशा शब्दात त्यांच्यावर टीकेचे क्लिक करण्यात आले आहे. कार्यक्रम घेतला असता तर जराही गर्दी झाली नसती. त्यामुळे मानहानी टाळण्यासाठी नागपूरला पळ काढला, अशी खास पुणेरी शेरेबाजीही करण्यात आली आहे.

त्यातच आता बापट यांनी खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. त्याची औपचारिक व अनौपचारिक वाच्यता करण्यात आली नसली तरी बापट यांचे त्याच दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या अहवाल प्रकाशनाने तेच सिद्ध होत आहे, असे निरीक्षण पुण्यातील राजकीय वर्तुळातील अनुभवी घटक व्यक्त करतात.

खरंतर बापट हे आमदार असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कार्यअहवाल प्रकाशित करणे सयुक्तिक होते. मात्र आता लोकसभेच्या तोंडावरती अहवाल प्रकाशित करून बापट यांनी पक्षांतर्गत संभ्रमावस्था निर्माण केली आहे. तसेच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आठ आमदार तीन खासदार या मजबूत परिस्थितीमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत देखील घवघवीत यश मिळेल याची खातरजमा करणे गरजेचे होते. त्याऐवजी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल अंतर्गत सूत्रांनी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांवर दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या निवडणुकीत तब्बल तीन लाखांहून अधिक मताधिक्क्याने निवडून आलेल्या अनिल शिरोळे यांची उमेदवारी आणि यंदाच्या निवडणुकीतील विजयाची शाश्वती अधिक बळकट करण्याचे सोडून व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेमुळे पक्षाचे आणि पर्यायाने फिर एक बार मोदी सरकार या पक्ष धोरणाचे नुकसान होत आहे, अशीही टीका केली जात आहे. बापट यांच्या अहवालासंदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्यानंतर नेटकरी वर्गाने म्हणूनच मुक्तकंठाने बापट यांना ट्रोल केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button