breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुंबई-पुणे मार्गावर मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये दिशादर्शक फलक कोसळल्याने वाहतूक खोळंबली

पिंपरी / महाईन्यूज

मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी-चिंचवड येथील मोरवाडी अंडरपासच्या जवळ दिशादर्शक कमान कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. ही घटना शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालू वाहतूक सेवारस्त्याने वळवली. लॉकडाऊन असल्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होती. या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनच्या समोर मोरवाडी अंडरपासजवळ क्रेनचा धक्का लागून ग्रेडसेपरेटरच्या मधोमध दिशादर्शक कमान कोसळली. क्रेन घेऊन ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता. 4.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना प्रतिबंध केल्याची सूचना दिलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करून ट्रकचालकाने ट्रक तसाच पुढे नेला. या घटनेमुळे बराचवेळ वाहतुकीला अडथळा झाला. दरम्यान, वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक वरील सेवारस्त्याने वळवली.

लॉकडाऊन असला तरी अधूनमधून मेट्रोचे काम केले जाते. त्यासाठी मोठमोठ्या क्रेनची आवश्यकता भासते. क्रेनचा धक्का लागून हा दिशादर्शक फलक कोसळला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अशा घटना घडत आल्या आहेत. पाठीमागे कासारवाडी येथे मोठी मशीन कोसळून दुर्घटना घडली होती.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/259085392629964

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button