breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मावळमधून पार्थ पवारांसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह – सुनिल तटकरे

मुंबई – पुण्यातील मावळमधून पार्थ पवार यांनाच निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दिली. कुठल्याही पातळीवर युवती नेत्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.

दरम्यान, पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत असले तरी लोकसभेसाठी मावळमधून त्यांच्याच नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अग्रक्रमाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे तटकरे यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडताना स्पष्ट केले.

पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी, असा तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह असून, याबाबत येत्या दोन-चार दिवसांत निर्णय होईल, असे तटकरे यांनी सांगितले. मावळमधून दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची कुठलीही चर्चा पक्ष पातळीवर झालेली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button