breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी टंचाईच्या विरोधात मनसेचे पिंपरी-चिंचवड पालिकेवर हंडा आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतनिधी

पाणी टंचाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेवर हंडा आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी निष्क्रिय पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. शहरातील नागरिकांवर पाणी टंचाई लादल्याने प्रशासनाचा आणि सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले, विद्यार्थी अध्यक्ष हेमंत डांगे, अश्विनी बांगर, सिमा बेलापुरकर, सुजाता काटे, विशाल मानकरी, अनिता पांचाळ, वैशाली बौराटे, नितिन चव्हाण, अक्षय नाळे, मयूर कांबळे, प्रतिक शिंदे, विकास कदम, अजय अड़गळे, नारायण पठारे, तेजस दाते, सुजय शिंदे, दीपेन नाईक, नितिन कावळे, अधिकराव पोळ, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, स्वप्निल महंगरे, रोहित काळभोर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुखड, सचिव रुपेश पटेकर आदींसह असंख्य मनसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button