breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाच वर्षात भाजपने ‘मेक इन इंडिया नाही, तर ब्रेक इन इंडिया’ केली – उदयनराजे भोसले

  • सातारा लोकसभा मतदार संघात आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा
  • भाजपच्या पाच वर्षातील चुकीच्या निर्णयांचा घेतला समाचार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल केली. थ्री डायमेंन्शनचा उपयोग केला. त्यामुळे आपलं कोण कल्याण करू शकत असेल तर भाजपवालेच करू शकतात, हा विश्वास लोकांना पटला. या आश्वासनांना जनता बळी पडली. परंतु, पाच वर्षात देशातील अवस्था पाहिली तर सत्ताधा-यांनी लोकांना गाळात घालण्याचे काम केले आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांत “मेक इन इंडिया नाही, तर ब्रेक इन इंडिया केली”, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी भाजपवर टिका केली.

सातारा लोकसभा मतदार संघात आघाडीच्या सभेत भोसले बोलत होते. व्यासपीठावर नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे पदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरपीआय जोगेंद्र कवाटे गटाचे नेते आदी यावेळी उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले की, 2014 च्या निवडणूक काळात रेडिओवर लोकांनी मन की बात ऐकली. त्यामध्ये काय असायचं, आमचं सरकार आलं तर गरिबांच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू, शेतक-यांची कर्ज माफी करू, दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, अशी आश्वासने दिले. त्यावर सर्वांनी विश्वास ठेवून मते दिली. गेल्या पाच वर्षात काय मिळालं किल्ला? अशा शब्दांत भोसले यांनी भाजपची खिल्ली उडवली. निवडणुकीकडे निवडणूक म्हणून न पाहता चळवळ म्हणून पहा. भाजपने घेतलेले अन्यायकारक निर्णय बाजुला करत नाही. तोपर्यंत परिस्थितीवर मात करू शकणार नाही. औद्योगिक क्षेत्रात उदासिनता निर्माण झाली आहे. रियल इस्टेट क्षेत्र झोपलंय. शेतक-यांची बिकट अवस्था झाली आहे. अशा अवस्थेत देशात शांतता आणि विकासात्मक बदल घडवायचा असेल तर आघाडीचं सरकारच ते करू शकतं, असेही भोसले यावेळी म्हणाले.

उदयनराजेंनी पत्रकारांना सुध्दा केली विनंती

लोकांचं हित जपण्याचं काम केवळ व्यासपीठावरल्या पदाधिका-यांचं नाही. समोर बसलेल्या लोकांचं देखील नाही. हे काम लोकशाहिच्या चौथ्या स्तंभाचं आहे. चुकीच्या पध्दतीने प्रसारण केलं तर जनता देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षात देशाची दुरवस्था झाली आहे. ती सुधारून काढण्यासाठी पुढची पाच वर्षे लागणार आहेत. चांगलं दाखवायचं की त्याचं वाईट करून दाखवायचं हे तुमच्याच हातात आहे. टीआरपी वाढविण्यासाठी थोड्या वेळासाठी बरं वाटतं. परंतु, देशाला वाचवायचं असेल तर माध्यमांची भूमिका महत्वाचे, असे असेही उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button