breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हरे राम, हरे कृष्णा… गीतावर लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांनी धरला ठेका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांनी धार्मिक गीतावर ठेका धरला. ते प्रचारानिमित्त लोकांच्या गाठीभेठी घेत आहेत. हरे राम हरे कृष्णा… या गीतावर ठेका धरल्याने पार्थ पवार नृत्य करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने अनेकांची मने आकर्षित केली आहेत.

मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून पार्थ पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आजोबा शरद पवार यांच्या उपस्थित त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. शनिवारी आकुर्डी येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत त्यांना कार्यकर्त्यांनी ठेका धरण्यास लावला. मुक्तपणे नृत्य करताना पार्थ पवार व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button