breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानी सैन्याचे विमान रहिवासी भागात कोसळले, १७ जण ठार

पाकिस्तानी सैन्याचे एक विमान नेहमीच्या सरावादरम्यान रावळपिंडी शहराजवळ कोसळले. या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन्ही पायलटसह ५ पाकिस्तानी जवानांचा समावेश आहे. तसेच १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

https://twitter.com/ANI/status/1156000569409994754

या दुर्घटनेबाबत पाकिस्तानी लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, या विमान अपघातात दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेता रावळपिंडींच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. बचाव पथकाच्या सदस्यांनी सांगितले की, या विमान दुर्घटनेत कमीत कमी १२ लोक जखमी झाले आहेत यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

https://twitter.com/ZeshanSyed08/status/1155993641959055360

पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीत ही दुर्घटना घडल्याने तातडीने आणि वेगाने बचाव कार्य सुरु करण्यात आले. मात्र, ही घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप पाकिस्तानी सैन्याने कुठलीही माहिती दिलेली नाही. दुर्घटनाग्रस्त विमानाने नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले होते. दरम्यान, अचानक ते रावळपिंडी शहराच्या बाहेर मोरा कालू या दाट लोकवस्ती असलेल्या गावात कोसळले.

वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांनुसार, विमान कोसळल्यानंतर रहिवासी भागात आग लागली. यामध्ये अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. बचाव पथकाच्या माहितीनुसार, या विमानाने अचानक आपले नियंत्रण गमावले आणि ते दुर्घटनाग्रस्त झाले. रात्रीची वेळ असल्याने बचाव मोहिम राबवताना अडचणी येत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button