breaking-newsराष्ट्रिय

मेट्रो स्थानकावर जोडप्याचे अश्लील चाळे, सीसीटीव्ही फुटेज पॉर्न वेबसाईटवर

दिल्ली मेट्रोच्या एका स्टेशनवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा लपून व्हिडिओ काढत तो चक्क पॉर्न वेबसाईटवर अपलोड केल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामधून १८ जुलै रोजी दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी कोणीतरी लाइव्ह फिडच्या माध्यमातून मोबाइलवर रेकॉर्ड केला. हाच व्हिडिओ नंतर पॉर्न वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याचे वृत्त “टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

हा व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पेरेशनने (डीएमआरसी) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात ‘डीएमआरसी’ने मेट्रो स्थानकामध्ये अश्लील चाळे करणाऱ्या अज्ञात जोडप्याविरोधात आजादपूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.

‘सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी ‘डीएमआरसी’ने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आम्ही सर्व संबंधित माहिती आणि घटनेचा व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द केला असून चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करत आहोत’ अशी माहिती ‘डीएमआरसी’चे प्रवक्ते अनूज दयाल यांनी दिली आहे.

‘मेट्रोच्या परिसरामध्ये, स्थानकामध्ये असे प्रकार करु नये असे आवाहनही आम्ही प्रवाशांना करत आहोत’. असं दयाल यांनी सांगितले. ‘डीएमआरसी’ने सीसीटीव्हीमधील हा व्हिडिओ मोबाइलवर रेकॉर्ड करुन तो पॉर्न साईटवर अपलोड करणाऱ्या कर्मचाऱ्यावर काही कारवाई केली का या प्रश्नाला दयाल यांनी ‘या प्रकरणातील सहभागी असलेल्या व्यक्तीविरोधात आम्ही कारवाई करत आहोत’ असे उत्तर दिले आहे.

आता ‘डीएमआरसी’ने अज्ञात जोडप्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलीस या जोडप्यावर काय कारवाई करते हे येणार काळच सांगेल. मात्र अशाप्रकारे मेट्रो प्रशासनाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षामधून स्थानकामधील व्हिडिओ पॉर्न साईटवर जात असतील तर त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजेसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रकारे हाताळतात यासंदर्भातही या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button