breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी तर,अनेक घरात पाणी घुसले

कोल्हापूर शहरात सध्या कोरोनाची भयानक परिस्थिती असतानाचं आता पावसाने देखील कहर केला आहे. काल म्हणजे 8 सप्टेंबरला ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने कोल्हापूरकरांची एकच तारांबळ उडाली. विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट यासह पाऊस शहराला झोडपून काढत आहे. शहरात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर सायंकाळी कोल्हापूर शहरासह पन्हाळा व इतर काही तालुक्यांना ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढले. विजेचा प्रचंड कडकडाट आणि वाऱ्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढत होता. जोरदार पावसामुळे अनेक घरात पाणी घुसले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी तुफान पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्व धरणे भरली. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. पण गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. चार ते पाच दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस बरसू लागला आहे. दिवसभर प्रचंड ऊन आणि रात्री पाऊस असा प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगळवारी दिवसभर उन्हाचा तडाका होता. सायंकाळी सहानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. सात नंतर अचानक जोरदार वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह पावसाने अक्षरशा झोडपून काढले. यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरात पाणी घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील बहुतेक सर्व तालुक्यांना पावसाने झोडपल्याने अनेक भाग जलमय झाले. पन्हाळा किल्ल्यावर तर सायंकाळी सहा वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे अनेक घरात पाणी घुसले काही. वस्तूही वाहून गेल्या. नाले आणि ओढेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

दरम्यान, हा पाऊस भुईमूग व भात पिकाला उपयुक्त असून काढणीस आलेल्या सोयाबीनला मात्र त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button