breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावरमधील विशेष न्यायालयाने २००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणीच्या खटल्यामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ पासून सुरु असणाऱ्या या खटल्यामध्ये मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले आहे. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पाकिस्तानमधील पहिलीच वेळ आहे.

देशात आणीबाणी पुकारणे हा देशद्रोह असून त्याच आरोपाखाली मुशर्रफ यांच्यावर खटला चालवला जावा, अशी मागणी करणारी याचिका येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयात २०१३ साली दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने ग्राह्य धरत खटला दाखल करुन घेतला होता. मागील सहा वर्षांपासून या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी न्यायलयाने आपला निर्णय सुनावला असून मुशर्रफ यांनामृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एखाद्या लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा आरोप केला जाण्याची पाकिस्तानमधील हे पहिलेच प्रकरण होते. अशा वेळी, ही कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने या प्रकरणामध्ये उडी घेत आपल्या माजी प्रमुखांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे नवीनच पेच उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. असे घडल्यास देशातील लोकशाही चौकटीस धक्का लागू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत होते. मागील सहा वर्ष चालेल्या या खटल्यामध्ये अखेर निकाल लागला आहे. आता या निकालाविरोधात मुशर्रफ वरिष्ठ न्यायलयामध्ये याचिका दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button