breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका, लालूंच्या पत्नीची सुनेविरोधात पोलिसांत तक्रार

महाईन्यूज | पटना

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात कलह सुरु आहे. लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी सून ऐश्वर्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तिने ऑक्टोबरमध्ये माझ्यावर जीवघेणा  हल्ला केला होता, असे सांगत राबडी देवी यांनी तक्रार दाखल केलेली आहे.

पार्टीचे आमदार शक्ती सिंह यादव यांच्यासोबत चर्चा सुरू होती. यावेळी ऐश्वर्याने अचानक खोलीत येत माझ्यावर हल्ला केला होता. तसेच, मला शिवीगाळ केली, असा दावा राबडी देवी यांनी केला आहे. तसेच खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकीही ऐश्वर्याने असल्याचे राबडी देवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ऐश्वर्या हिने गेल्या रविवारी सासरी छळ होत असल्याचा आरोप करत कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. रविवारी ऐश्वर्या हिने सासू राबडी देवी तसेच अन्य कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले होते. राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button