TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कॅमेरा’ समोर दिसला की बोलणा-यांमधील मी नाही, राज ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला

पिंपरी चिंचवड | मीडियाचे कॅमेरे समोर दिसले की काहीजण बोलायला सुरुवात करतात. असे काही लोक असतात. पण, मी त्यापैकी नाही असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना सणसणीत टोला लगाविला.

मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, बाबू वागस्कर, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन चिखले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे जवळपास पाऊन तास जनसंपर्क कार्यालयात थांबले होते. त्यांनी शहरातील पक्ष संघटनेचा संपूर्ण आढावा घेतला. पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”मी पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड शहरात आलो नाही. आठवड्याभरात मी परत पुण्याला येणार आहे. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये येईल. तुमच्यासोबत संवाद साधेल हा माझा शब्द असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले”.

दरम्यान, दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. ठाकरे यांनी पुण्यात बोलताना संजय राऊत पत्रकार परिषदेत काहीही बोलतात असे टीकास्त्र सोडत त्यांची नक्कल केली होती. त्यावर राऊत यांनी ‘ईडीने’ बोलविल्यानंतर आम्ही गप्प बसणा-यातले नाहीत असे सांगत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आज पुन्हा राज यांनी ‘कॅमेरा’ समोर दिसला की बोलणा-यांमधील मी नाही असे म्हणत नाव न घेता अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना सनसणीत टोला लगाविला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button