breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खड्डे पडल्याची कबुलीच!

  • बुजविले 900 खड्डे : निकृष्ट कामांवर शिक्कामोर्तब

पुणे – पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने रस्ते दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यात तब्बल 900 खड्डे बुजविले आहेत. तर यासंबंधित हेल्पलाइनवर आतापर्यंत सुमारे 129 कॉल आले असून तक्रारी आलेल्या खड्ड्यांचाही त्यात समावेश असल्याचे पथ विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शहरात पावसाळापूर्व रस्ते दुरूस्ती निकृष्ट झाली, शिवाय यासाठीचा कोट्यवधींचा खर्चही पाण्यात गेला आहे.

गेल्या आठवड्यातील पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. क्षेत्रीय कार्यालय तसेच ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभाग जलवाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्ते दुरूस्तीनंतर केलेली कामेही निकृष्ट असल्याने चाळण झाली आहे. गुरूवारच्या मुख्यसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर आता प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी वेगाने कामे सुरू केल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पावसकर म्हणाले, क्षेत्रिय कार्यालयांकडे असलेल्या रस्ते दुरुस्ती व्हॅनमार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविले गेले आहेत. त्यावर जवळपास 30 लाखांचा खर्च झाला आहे. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकावर गेल्या तीन दिवसांत 129 तक्रारींची नोंद झाली असून त्यात शुक्रवारी आलेल्या 22 तक्रारींचा समावेश आहे.

“एमएसआरडीसी’चेदेखील दुर्लक्ष

स्वारगेट येथील जेधे चौकातील उड्डाणपूल रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. त्यामुळे येथील खड्ड्यांची जबाबदारी “एमएसआरडीसी’ची आहे. मात्र, त्यांच्याकडून उपाय योजना होत नाही. त्यामुळे पालिकेची नाहक बदनामी होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे पावसकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button