breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील भूयारी मेट्रोसाठी 1160 कोटी रुपयांची निविदा मंजूर

पुणे – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गातील फडके हौद ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाची सुमारे ११६० कोटी रुपयांची निविदा महामेट्रोने नुकतीच मंजूर केली आहे. मेट्रोसाठी बोगदा खणण्यासाठी हाँगकाँगमधून आधुनिक ‘टनेल बोअरिंग मशिन’ पुण्यात येणार आहे. टाटा आणि गुलेरमार्क या कंपन्यांकडून भुयारी मेट्रोचे काम होणार आहे.

पिंपरी-स्वारगेट हा मेट्रो मार्ग १६.५८ किलोमीटरचा आहे. त्यातील ५.०१ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यानचा मार्ग भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर बस स्थानक, शिवाजीनगर न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट अशी पाच स्थानके आहेत. त्यातील फडके हौद, मंडई आणि स्वारगेट येथे भुयारी स्थानके आहेत. मेट्रोसाठी दोन भुयारी ट्यूब करण्यात येणार आहेत.

हाँगकाँगमधून येणाऱ्या मशिनची लांबी सुमारे १२० मीटर असून, सुमारे ८ मीटर रुंद आहे. हे मशिन रोज सुमारे ५ मीटर बोगद्याची खोदाई करेल. सप्टेंबरमध्ये मशिन पुण्यात दाखल होऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरवात होईल, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

भुयारी मेट्रोचे काम दाट लोकवस्तीच्या भागात होणार आहे. या मार्गामुळे २९६ घरे, १०६ दुकानांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यांना त्याच परिसरात पर्यायी घरे आणि दुकाने देण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याला संबंधितांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button