breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी मंडळांनी कार्यवाही करावी – आयुक्त श्रावण हार्डीकर

  • शांतता बैठकीत आयुक्तांचे मंडळांना आवाहन
  • पारंपरिक ढोल-लेझीमचा वापर करावा

पिंपरी – गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेतलेली असून त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल. विसर्जन मार्गावरील खड्डे हे बुजवण्यात येतील. तसेच, अधिकृत विज जोड घ्यावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या जाहीर आवाहनाप्रमाणे गणेश मंडळानी कार्यवाही करावी. मिरवणुकीतील पारंपारिक ढोल लेझीमचा वापर करून ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी लोखंडी ढोलचा वापर कमी करण्याबाबत मंडळानी विचार करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित केलेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१८ च्या शांतता बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, देहूगाव पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, विलास मडीगेरी, तुषार कामठे, नामदेव ढाके, विलास डोळस, वसंत बोराटे, स्विकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, नामनिर्देशित सदस्य सागर हिंगे, दिनेश यादव, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, स्मार्तना पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सतीश पाटील, चंद्रकांत अलसटवार, तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव हा निर्विघ्नपणे व पर्यावरण पूरक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. गतवर्षी झालेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील बक्षीसपात्र मंडळांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक कारणास्तव बक्षिसे देता येणार नाहीत, याबाबत उपस्थित गणेश मंडळांना अवगत करून पुढील वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येतील.

 

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव हा नवीन पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रथमच होत असून पोलिसांची संख्या कमी आहे. याबाबत गणेश मंडळांशी संवाद साधून विश्वासू कार्यकर्त्यांना पोलीस मित्र म्हणून नेमणूक करणार आहोत. गणेश उत्सव मंडळांनी डी. जे. ऐवजी मराठी कर्णमधुर गाणी वाजविण्यावर भर द्यावा, आणि यंदाचा गणेशोत्सव लाठी शिवाय पोलीस असा असणार आहे.

 

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सूचना करताना प्रत्येक मंडळानी नोंदणी करणे आवश्यक आहे. गर्दीसाठी जास्त स्वयंसेवक नेमावेत खाजगी तसेच शाळेची मैदाने वाहन पार्किंगकरिता वापरण्यासाठी प्रयत्न करावेत. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न करावेत. ज्या दिशेला रस्ता आहे, त्या दिशेला प्रवेशद्वार व मंडप उभारणी करावी. जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा सूचना त्यांनी मांडल्या.

 

गणेश मंडळाच्या मधुकर बाबर, सुभाष महाजन, आनंदा जाधव, गणेश वाळूंज, मारुती भापकर, नेताजी भोसले, शिवाजी सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी त्यांच्या सूचना मांडल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button