breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: तेजस लढाऊ विमान हवाई दलाच्या स्क्वाड्रन क्रमांक १८ मध्ये सामील

तमिळनाडूतील कोइम्बतूर शहराच्या सीमेवरील सुलुर येथील हवाई दल स्थानकावर बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ हे पहिले हलके लढाऊ विमान ‘फ्लाइंग बुलेट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या १८ क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये सामील केले.

बंगळूरु येथील हिंदुस्तान एअरॉनॉटिकल लि. (एचएएल) ने तेजस एमके-१ हे विमान तयार केले आहे. एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी विमानाचे दस्ताऐवज हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांना सोपवले. याप्रसंगी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली.

भदौरिया यांनी पहिल्या तेजस एमके-१ लढाऊ विमानाची प्रतीकात्मक चावी १८ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन मनीष तोलानी यांना सोपवली. यापूर्वी भदौरिया यांनी या एक सीटर विमानाचे उड्डाण केले.

तेजस हे स्वदेशात निर्मित चौथ्या पिढीचे विना शेपटीचे डेल्टा विंग विमान आहे. यापूर्वी सुलुर येथीलच ४५ स्क्वाड्रनला सोपवण्यात आल्यानंतर, हे विमान मिळणारे क्र. १८ स्क्वाड्रन हे दुसरे ठरले आहे.

हे विमान फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, इंटिग्रेटेड डिजिटल अ‍ॅव्हिऑनिक्स आणि मल्टी-मोड रडार यांनी सज्ज आहे. चौथ्या पिढीच्या ध्वनीतीत लढाऊ विमानांच्या गटातील हे सर्वात कमी वजनाचे आणि लहान विमान आहे.

१९६५ साली स्थापन झालेली १८ क्रमांकाची स्क्वाड्रन यापूर्वी मिग-२७ विमानांचे उड्डाण करीत असे. पाकिस्तानशी झालेल्या १९७१च्या युद्धात सक्रिय भाग घेऊन तिने ‘काश्मीर खोऱ्याचे संरक्षक’ असे बिरुद मिळवले होते. या वर्षी १ एप्रिलला सुलुर येथे तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button