breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा हत्येचा कट, ठार मारण्यासाठी तब्बल दोन कोटींची सुपारी दिली

परभणी: राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटीसारख्या दिग्गज व्यक्तींना ठार करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याच्या घटना अनेकदा कानावर येतच असतात. त्यात आता परभणीहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांना ठार मारण्यासाठी तब्बल 2 कोटींची सुपारी देण्यात आली असल्याचे पोलिस तपासात उघड झालेले आहे.

संजय जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदेड येथील रिंदा गँगला त्यांची हत्या करण्यासाठी ही सुपारी देण्याचे आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे जाधवांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे परभणीमधील एका बड्या व्यक्तीकडूनच ही सुपारी देण्यात आलेली असल्याचे संजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button