breaking-newsपिंपरी / चिंचवड

पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी युवकचा पद नियुक्ती कार्यक्रम जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहर, विधानसभा आणि प्रभाग स्तरावर नवीन पदाधिका-यांना काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. पक्षाचा कार्यक्रम घराघरात पोहोचविण्यासाठी या नियुक्त्या महत्वाच्या ठरणार आहे. त्याचा कार्यक्रम युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी जाहीर केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या दीड वर्षावर आलेली आहे. त्यानुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोविड 19 च्या परिस्थितीतून मार्ग काढत राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने नियुक्ती वाटप कार्यक्रम जाहीर केला आहे. 16 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी त्यांच्या वाकडमधील जनसंपर्क कार्यालयात या नियुक्त्या जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता नवीन पदाधिका-यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा तसेच प्रभाग स्तरावर नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे युवक संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. प्रभाग स्तरावरील नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादीला तळागाळात पोहोचण्यास वाव आहे. पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविता येणार आहे. तसेच, प्रत्येक नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button