breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Ajinkya Rahane | मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने खरेदी केली ३.५ कोटींची कार

Ajinkya Rahane | भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या संघातून बाहेर आहे. आता तो रणजी ट्रॉफी खेळत आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेने एक आलिशान कार खरेदी केली आहे. कार खरेदी करतानाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसोबत कारची चावी घेताना दिसत आहे. ज्याची बरीच चर्चा आहे.

अजिंक्य रहाणेने नुकतीच स्वत:साठी नवीन Mercedes-Maybach GLS 600 लक्झरी एसयूव्ही खरेदी केली आहे. या एसयूव्हीची किंमत तब्बल ३.५ कोटी रूपये आहे. अजिंक्य रहाणेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर रहाणेच्या आधी विराट कोहलीनेही ही कार खरेदी केली होती. आता अजिक्य रहाणेने ही कार खरेदी केली आहे.

हेही वाचा      –        आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! 

अजिंक्य रहाणेच्या नवीन मर्सिडीज मेबॅच GLS600 बद्दल भाष्य करायचे झाले तर, या लक्झरी SUV मध्ये ४.० लिटर बायटर्बो वी ८ इंजिन आहे, जे ४८ व्होल्ट इलेक्ट्रिक सिस्टम तसेच EQ फंक्शनने सुसज्ज आहे. हे इंजिन ५५७ एचपीची कमाल पॉवर आणि ७३० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. Mercedes-Benz Maybach GLS 600 या गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये एवढी आहे. ही गाडी कंपनीची भारतातील प्रमुख SUV आहे, या आलिशान गाडीची किंमतही तेवढीच मोठी आहे. या लक्झरी कारमध्ये ४.० लीटर V8 ट्विन टर्बो इंजिन आहे, जे ५५० hp ची पॉवर आणि ७३० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button