breaking-newsपिंपरी / चिंचवड

क्वॉरंटाईन सेंटरसाठी एका बांधकाम व्यावसायिकाने पालिकेला दिली मोठी इमारत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना कोविड – 19 जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शहरात दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. उपलब्ध बेड व क्वॉरंटाईन सेंटर मधील जागा कमी पडत आहे. हे विचारात घेऊन शहरातील गरजू रुग्णांना सेवा मिळावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक राजकुमार आणि श्रीचंद आसवाणी यांनी 54 फ्लॅटची इमारत क्वॉरंटाईन सेंटरसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

आसवाणी बंधुंचा ‘आसवाणी गॅलेक्सी’ हा वाकड येथे सर्वेनगर 201, हिस्सा 1, पिंक सिटी रोड, युरो स्कूल समोर गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील ‘ई’ इमारतीमध्ये 54 फ्लॅट बांधून पूर्ण झालेले आहेत. हि इमारत त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे. तसे पत्र त्यांनी मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

प्रशस्त पार्किंग, सुरक्षा व्यवस्था असणा-या या इमारतीत 54 फ्लॅटमध्ये बेड, फॅन, लाईट गिझर, स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ठिकाणी 400 पेक्षा जास्त रुग्णांना क्वॉरंटाईन सेवा उपलब्ध होईल. ‘आसवाणी गॅलेक्सी’ या गृहप्रकल्पाचे संचालक राजकुमार शामनदास आसवाणी, श्रीचंद शामनदास आसवाणी, अनिल शामनदास आसवाणी, सतिश शामनदास आसवाणी, संदिप रसिकलाल शहा या सर्वांच्या सहकार्याने हि इमारत देण्यात आली आहे. अशी माहिती आसवाणी पॅराडाईज कंपनीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button