breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पक्षांतर्गत कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा !

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा पक्षांतर्गत एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपला पदाचा राजीनामा बुधवारी (दि.14) दिला. महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला. या वेळी पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

ठेकेदारांना त्रास दिल्याने राजीनामा दिल्याची चर्चा चुकीची असून सोशल मीडियावर तशी अफवा पसरविली जात आहे. कोणाला त्रास दिला असेल तर, त्यांनी समोर येऊन तक्रार करावी, असे सांगून हिंगे पुढे म्हणाले, पक्षाने मला क्रीडा समिती सभापती तसेच उपमहापौरपद दिले. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. दोन्ही पदांवर पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि पक्ष धोरणाशी सुसंगत काम करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या धोरणानुसार सर्वांना संधी मिळावी म्हणून पदाचा कार्यकाळ एका वर्षांचा निश्‍चित केला आहे. मला वर्षापेक्षा अधिक काळ पद भूषविण्याची संधी मिळाली.

महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मी राजीनामा दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी तशी सूचना केली होती. त्यानुसार आज मी महापौर ढोरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. माझ्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत मी पूर्णपणे समाधानी आहे, असेही हिंगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, त्यांच्याकडे क्रीडा विभागाचे सभापतीपद ही होते. त्या काळात महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा घेऊन त्यांनी शहरातील क्रीडा क्षेत्रास नवसंजीवनी दिली.

कोरोना संकटकाळात दिला जनतेला आधार !

उपमहापौर हिंगे यांचा अर्ध्याहून अधिक काळ कोरोना संकटाचा सामना करताना गेला. हिंगे यांनी संकटकाळात सामान्य पिंपरी-चिंचवडकरांना आधार देत फिल्डवर काम केले. महापालिका आणि सामान्य नागरिक यांचा दुवा म्हणून काम करताना कामाच्या माध्यमातून ‘एक्टिव्हपणा’ दाखवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button