breaking-newsआंतरराष्टीय

पंतप्रधान मोदी आणि पुतिन आज मुख्य मुद्यांवर चर्चा करणार…

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे सध्या भारत दौऱ्यावर  आले आहेत.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठकी  ते भारतात आले आहेत. हा भारत दौरा दोन्ही देशांसाठी खूप महत्वाचा असून या दौऱ्यातील बैठकीत दोन्ही देशांत एस-400 हवाई रक्षा प्रणालीसह अंतराळ आणि ऊर्जा या नातवाच्या क्षेत्रातील काही करारांवर स्वाक्षरी  होऊ शकतात.

गुरुवारी पुतिन यांचे स्वागत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. त्यानंतर ते तेथूनच थेट कल्याण येथे स्थित पंतप्रधान निवासात गेले. जेथे दोन्ही नेत्यांनी समोरासमोर चर्चा केली.  त्यानंतर मोदीजींनी त्यांच्यासाठी खाजगी जेवणाची व्यवस्था केली. रशियाच्या राष्ट्रपतीसह एक प्रतिनिधिमंडळ देखील भारतात आले आहे ज्यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरीसेव, विदेश मंत्री सर्गेई लावरोव आणि  व्यापार व उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव  यांचा समावेश आहे.

आज  १९व्या भारत -रशिया शिखर सम्मेलनात पंतप्रधान मोदी आणि पुतिन विविध द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर व्यापक चर्चा करणार आहेत. यामध्ये मास्कोच्या विरोधात अमेरिकेचे प्रतिबंध आणि  दहशतवाद विरोधी सहयोग यांचा समावेश आहे. बैठकीच्या अगोदर प्रधानमंत्रीनी ट्विटमध्ये लिहले आहे, राष्ट्रपती पुतिन, भारतात आपले स्वागत आहे. चर्चेसाठी खूप उत्सुक आहे. याद्वारे भारत -रशिया संबंध आणखी दृढ होतील. हा ट्विट त्यांनी रशियन भाषेत सुद्धा केला आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Narendra Modi

@narendramodi

Welcome to India, President Putin.

Looking forward to our deliberations, which will further enhance India-Russia friendship. @KremlinRussia_E

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button