breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे: दहावी बोर्ड परीक्षा निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडलेली होती. मार्च 2020 मध्ये एकूण 9 बोर्डात दहावीची परीक्षा झाली होती.  या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेत झालेल्या सर्व विषयांचे गुण वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय होणार आहे.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार…

राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button