breaking-newsआंतरराष्टीय

युरोपीय महासंघाची “ब्रेग्झिट’ला सहमती

लंडन : युरोपीय महासंघातून ब्रिटनने 31 ऑक्‍टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने जाहीर केले.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केले; तर युरोपीय महासंघाचे अध्यक्ष जीन-क्‍लॉड जंकर यांनी हा “वाजवी आणि संतुलित करार’ असल्याचे सांगत संघटनेच्या सध्या ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या परिषदेत सदस्य देशांनी त्याला मंजुरी द्यावी, अशी शिफारस केली.तथापि, या कराराला मंजुरी मिळण्यासाठी जॉन्सन यांना संसदेत आवश्‍यक बहुमत मिळते की नाही हे अद्याप कळायचे असल्याने नव्या कराराचे भवितव्य अधांतरी आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला पाठिंबा देणाऱ्या नॉर्दर्न आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने (डीयूपी) जॉन्सन यांच्याविरुद्ध उघड बंड केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button