breaking-newsराष्ट्रिय

पंजाबमधील गुरू गोविंदसिंह स्टेडियमला पीएनबीचे सील

जालंधर (पंजाब) – येथील गुरू गोविंदसिंह स्टेडियमला पीएनबी (पंजाब नॅशनल बॅंक) प्रतीकात्मक सील ठोकणार आहे. इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्टेडियमला बॅंकेने सील ठोकू नये यासाठी केलेल्या प्रयत्नांचा काही उपयोग झालेला नाही.
स्टेडियमला प्रतीकात्मक सील ठोकल्याच्या माहितीला दुजोरा देत पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्ट कर्जाची परतफेड करत नसल्याने स्टेडियमला सील ठोकून पुढील कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

बॅंकेकडे ट्रस्टची 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता गहाण ठेवण्यात आलेली आहे. ट्रस्टने 2011 मध्ये 175 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी 112 कोटी रुपये अद्याप येणे आहे. कर्जची थकबाकी 12 जुलैपर्यंत अदा करण्यासाठी बॅंकेने ट्रस्टला 1 जुलै रोजी नोटीस दिली होती. 13 जुलै रोजी 60 लाख रुपये जमा करून ट्रस्टने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुद्‌त मागितली होती. 26 ऑगस्ट्‌पर्यंत ट्रस्टने 1.40 कोटी रुपये जमा करून आणखी 70 लाख जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते.

31 मार्च 2018 रोजी बॅंकेचे खाते एनपीए बनले आहे. एनपीएतून बाहेर पडण्यासाठी ट्रस्टने 26 कोटी रुपये जमा करणे आवश्‍यक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button