breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

न्यू सिटी प्राईड’च्या विद्यार्थी दिंडीचे रहाटणीत कौतुक, दिंडीतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पिंपरी, (महाईन्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एजुकेशन फाऊंडेशन  संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी वारक-यांची वेशभूषा केली होती. अत्यंत सोज्वळ आवाजात हरिनामाचा होणारा गरज आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या लहान वारक-यांनी सर्वांना आकर्षित करून घेतले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी वारक-यांचा वेष परिधान करून दिंडीमध्ये सहभागी झाल होते. ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत विद्यार्थी वारक-यांची दिंडी जोमाने पुढे जात होती. परिसरातील नागरिकांनी या लहानग्यांच्या वारीचा मनमुराद आनंद लुटला. हरिनामाचा गजर आणि विठुनामात तल्लीन झालेली लहानगी मंडळी पाहून वरीष्ठांच्या चेह-यांवर हसू फुलत होते. रहाटणी परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निर्मला कुटे, पोपट नखाते, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत यांच्यासह राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पालक विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अनेक विद्यार्थीनी डोक्यावर तुळसीवृंदावन घेवून विठू नामाचा जयजयकार करीत होते. तर, विद्यार्थी गळ्यात टाळ व पताका अडकून ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत दिंडीत सहभागी होते. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या. ’स्त्री भृणहत्या’,’पाणी वाचवा- पाणी जिरवा’हा संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल, रुक्मिणी, कृष्ण असे अनेक वेगवेगळी वेशभूषा केलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ही दिंडी शाळेपासून शिवार चौकातून परत शाळेत मुक्कामी आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button