breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

म्हाडा इमारतीच्या 19 व्या मजल्यावरून खाली पडून एकाचा जागीच मृत्यू

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरीतील म्हाडाच्या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

राजकुमार अशोक घोसले (२४) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. बाबुराव यादव आणि करण यादव अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. मयत राजकुमार आणि दोन कामगार हे क्रेन वर उभे राहून सेफ्टी बेल्ट वापरून १८ आणि १९ व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा अचानक उभा असलेल्या क्रेनचे ब्रेक निकामी झाले. आणि कामगार खाली पडले. यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर, बाबुराव यादव आणि करण यादव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सेफ्टी बेल्ट असताना कामगार खाली पडलेच कसे असा प्रश्न निर्माण असून घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button