breaking-newsआंतरराष्टीय

नोएडात नमाजनंतर आता भागवत कथाही रोखली

नोएडात सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाविरोधात सक्तीचे धोरण अवलंबण्यात आले आहे. नोएडातील प्राधिकरणाच्या बागेत नमाज पठण करण्यापासून रोखल्यानंतर ग्रेटर नोएडात बुधवारी अधिकाऱ्यांनी सेक्टर- १७ मध्ये विना परवानगी  भागवत कथेचा कार्यक्रम करणाऱ्यांना रोखले. प्राधिकरणाच्या सीईओंनी हे प्रकरण गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांना सक्त कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

नोएडातील सेक्टर ५८ येथील बागेत विना परवानगी नमाज पठण केले जात असत. हे रोखल्यापासून मोठा वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. याचदरम्यान बुधवारी ग्रेटर नोएडातील सेक्टर ३७ मध्येही प्राधिकरणाच्या जागेवर काही लोकांनी विना परवानगी भागवत कथेसाठी मंडप टाकला होता. त्याचबरोबर तिथे म्यूझिक सिस्टिम आणि माईक लावण्यात आले होते.

प्राधिकरणाच्या पथकाने बुधवारी सकाळी हे मंडप हटवले. यावेळी आयोजकांमधील महिला आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झणला. भाजपाचा झेंडा असलेली एक कार घटनास्थळी होती. तेथील काही लोकांनी पक्ष आणि सरकारच्या नावावर अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत प्राधिकरणाचे पथक तिथे होते. मात्र, घटनास्थळावरुन प्रतिमा काढण्यात आलेली नाही.

देवाच्या कथेसाठी परवानगी घेण्याची गरज नाही, असे आयोजक रिंकी बन्सल यांनी म्हटले आहे. काही लोक चुकीची तक्रार करून वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button