breaking-newsराष्ट्रिय

शिक्षिकेला ‘धडा’ शिकवण्यासाठी मोबाईल नंबर टाकला पॉर्न साईटवर, विद्यार्थ्याला अटक

गुजरातच्या अहमदाबादमधून एका 24 वर्षीय विद्यार्थ्याला महिला प्राध्यापकाचा मोबाइल नंबर डेटिंग साईटवर टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या विद्यार्थ्याने काही पॉर्न साईटवरही या प्राध्यापिकेचा नंबर टाकला होता. अहमदाबाद क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने या विद्यार्थ्याला सोमवारी रात्री उशीरा अटक केली.

अभ्यासात लक्ष नसल्यामुळे चार महिन्यांपूर्वी 40 वर्षीय प्राध्यापिका या विद्यार्थ्याला ओरडली होती. त्याचा राग या विद्यार्थ्याच्या मनात होता, आणि बदला घेण्यासाठी त्याने शिक्षिकेचा नंबर डेटिंग व पॉर्न साईटवर टाकला होता, अशी माहिती त्याने पोलीस चौकशीत दिलीये. त्याने सर्वप्रथम वेगवेगळ्या साईट्सवर फेक आयडी बनवला आणि त्यानंतर नाव, नंबर, इमेल आयडी आणि शिक्षिकेचा फोटो अपलोड केला. यानंतर शिक्षिकेला अनोळखी क्रमांकावरुन फोन यायला सुरूवात झाली. याशिवाय अनेकांकडून तिला आक्षेपार्ह इमेल आणि मेसेज आले. वैतागलेल्या शिक्षिकेने अखेर गेल्या आठड्यात पोलिसांत तक्रार केली.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित वेबसाइट्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्राध्यापिकेची वैयक्तिक माहिती अपलोड करणाऱ्याची माहिती मागितली. त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला अटक कण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button