breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवृत्त कर्मचा-यांनी आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण कराव्यात – महापौर माई ढोरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून निवृत्त होणा-या कर्माचा-यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांच्या राहून गेलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करावी, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

नोव्हेंबर २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १२ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहातील या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी देखील उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक प्रकाश बने, पुष्पा कुमार, मुख्य लिपिक शांताराम कंधारे, उपशिक्षक छाया ढमाले, शफकतआरा महमंद कुद्सी, मंदाकिनी गायकवाड, मुकादम काशिनाथ देवकर, तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सहाय्यक शिक्षिका पद्मजा गायकवाड, उपशिक्षिका रत्ना संगमनेरकर, सफाई कामगार बारींद्र अंदुरकर, रतन लोंढे आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button