TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सहकारनगर भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : सहकारनगर भागात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून एक लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. रोहन काळुराम खुडे (वय २६, रा. भांबरे संस्कृती भवन शाळेसमोर, पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सहकारनगर भागात गस्त घालण्यात येत होती.धनकवडीतील राऊत बागेजवळ एकजण अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर सापळा लावून खुडेला पकडण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या छोट्या प्लास्टिक पिशवीत मेफेड्रोन सापडले. खुडे याच्याकडून एक लाख चार हजार ५५० रुपयांचे सहा ग्रॅम ९७० मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.खुडेने मेफेड्रोन कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, सचिन माळवे, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मनोज साळुंके आदींनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button