breaking-newsपिंपरी / चिंचवड

3 डिसेंबर रोजी शहरातील दिव्यांगांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमांची ‘मेजवानी’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिनांक ३ डिसेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दिव्यांगासंबंधित उल्लेखनिय कार्य करणा-या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी व्यवसाय (करिअर) मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम पिंपरी-चिचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केला आहे. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी उपस्थित राहवे, असे आवाहन नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button