breaking-newsराष्ट्रिय

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मुख्यालयावर प्राप्तीकर विभागाचे छापे; लेखा विभागाला लावले कुलूप

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे. त्यात काँग्रेस अडचणीत आली असून, प्राप्तीकर विभागाने काँग्रेसच्या मुख्य लेखा विभागावर छापे टाकले आहेत. याचबरोबर लेखा विभागात कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जाण्याच्या काळात छापे टाकून लेखा विभाग बंद करण्यात आला आहे. राजकीय सूडभावनेतूनच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असलेल्या काँग्रेसला शनिवारी धक्का बसला. दिल्लीतील २४, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. या कारवाईनंतर विभागाने लेखा विभागाला टाळे लावले  असून, या विभागात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या घरीही छापे टाकले आहेत. मॅथ्यू वर्गीस यांच्यासह चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. वर्गीस गेल्या चार दशकांपासून काँग्रेसच्या लेखा विभागात कार्यरत असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी दिली. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन प्राप्तिकर अधिकारी विचारपूस करीत आहेत. त्याच वेळी काँग्रेसच्या लेखा विभागालाही प्राप्तिकर खात्याने टाळे ठोकले आहेत.

काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले, “पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने छापे घालण्यात येत आहेत, ही शरमेची गोष्ट आहे. या देशात विरोधकांसाठी एक आणि भाजपसाठी दुसरी अशा दोन नियमावली, दोन कायदे, दोन घटना आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी वाईट बातमी आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button