breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

वाईजवळ दरड कोसळली;१५ जणांना बाहेर काढले

  • पाच ते सहा घरांवर कोसळली दरड

वाई |

साताऱ्यात व महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस सुरू असून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील देवरुखवाडी या वस्तीवर पाच ते सहा घरांवर रात्री आठ साडेआठच्या सुमाराला दरड कोसळून वीस रहिवासी अडकले. या परिसरात वीस घरे असून त्यातील पाच ते सहा घरे त्यातील कुटूंबियांसह दरडी खाली अडकली आहेत. यामध्ये वीस लोक अडकले आहेत. त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासन व आरोग्य व्यवस्था घटनास्थळी पोहोचली आहे. जेसीपी च्या माध्यमातून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या घरातून बाहेर काढलेल्या तीन-तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरणाच्या लगत देवरुखकरवाडी या वस्तीवर रात्री आठ साडेआठच्या सुमाराला दरड कोसळली या वस्तीवर वीस घरे असून पाच ते सहा घरांवर दरड कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता आहे .त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत कार्यासाठी प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक या परिसरातील विज खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचण येत आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे सर्व प्रशासन आरोग्य व्यवस्था रुग्ण वाहिका या ठिकाणी पोहोचले आहेत. चार जेसीबीच्या माध्यमातून युद्धपातळीवर दरड बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे. दरडी खालून काढलेल्यातील तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे आणि या मार्गावरील रस्ते व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे जागेवर पोहोचण्यात व मदत कार्यात अडचणी येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button